Business Idea Of Bamboo Farming | बांबूची शेती करून आयुष्यभर कमवा बक्कळ पैसा, सरकार देतंय 50 % सबसिडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय करत असतात. अनेक लोक म्हणतात की, आजकाल शेतीमध्ये जास्त नफा नाही. परंतु आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक तरुण देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. अगदी कमी पैशांमध्ये आम्ही कमी कष्ट करून ते खूप चांगले उत्पन्न घेत आहेत. त्यात बांबूची शेती ही एक अशी शेती आहे. ज्यात तुम्ही अत्यंत कमी मेहनत करून देखील खूप जास्त पैसा कमावू शकता. त्याचप्रमाणे बांबूच्या लागवडीसाठी तुम्हाला शासनाकडून सबसिडी देखील मिळते. मध्यप्रदेश या राज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी 50% देत आहे. त्यामुळे या प्रदेशात बांबूला (Business Idea Of Bamboo Farming ) हिरवे सोने असे देखील म्हणतात. कारण यापासून खूप चांगला आर्थिक फायदा होतो.

देशामध्ये असे फार कमी लोक आहेत. जे बांबूची लागवड करतात. बांबूची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेमध्ये बांबूची लागवडी अत्यंत सुरक्षित मानली जाते. कारण यातून उत्पन्न देखील खूप चांगले होते. आणि त्यासाठी जास्त कष्ट देखील करावे लागत नाही. बांबूची शेती कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. तुम्ही एकदा बांबूची शेती केल्यावर अनेक वर्षे त्याचा नफा मिळवता येतो. यामध्ये खर्च आणि मेहनत दोन्हीही कमी लागते. अगदी ओसाड जमिनीत देखील तुम्ही बांबूची लागवड करू शकता. आणि त्यातून चांगले उत्पन्न घेऊ शकता.

अशाप्रकारे करा लागवड | Business Idea Of Bamboo Farming

बांबूची शेती करण्यासाठी तुम्ही बांबूची रोपे ही कोणत्याही नर्सरीतून घरी आणून ती जमिनीत लावू शकता. यासाठी माती जास्त रेताळ नसावी. यासाठी दोन फूट खोल आणि दोन फूट रुंद असा खड्डा खोदून बांबूची लागवड करता येते. त्यानंतर तुम्ही शेणखत टाकू शकता. तुम्ही हि रोपे लावल्यानंतर लगेच त्यावर पाणी द्या. एक महिना दररोज पाणी घाला. सहा महिन्यात आठवड्यातून एकदा पाणी द्यायला सुरुवात करा.

एका हेक्टर जमिनीत तुम्हाला जवळपास 625 बांबूची रोपे (Business Idea Of Bamboo Farming ) लावता येतात. ही रोप अगदी तीन महिन्यातच तुम्ही काढू शकता. त्याचप्रमाणे बांबूची झाडांची वेळोवेळी छाटणी करून तुम्ही त्यातून चांगला नफा मिळू शकता. बांबूचे पीक हे तीन-चार वर्षात तयार होतं. भारत सरकारने देशात बांबूच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले आहे.

बांबूच्या पिकासाठी सरकारकडून सबसिडी देखील मिळते. कागद बनवण्यासाठी कार्बनिक कापड बनवण्यासाठी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे अनेक सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी देखील बांबूचा वापर केला जातो. म्हणूनच आजकाल बाजारात बांबूची मागणी देखील वाढलेली आहे.

किती होईल उत्पन्न?

दोन ते तीन वर्षाच्या मेहनतीनंतर तुम्हाला बांबूच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू शकते. या बांबूच्या लागवडीतून तुम्ही 4 वर्षात 40 लाख रुपयांचे उत्पन्न देखील घेऊ शकता. कारण ही झाडे कापल्यानंतर पुन्हा एकदा वाढतात. बाजारात देखील या बांबूच्या झाडाला खूप जास्त मागणी आहे. यामुळे तुमचा नफा अनेक पटींनी वाढेल. बांबूची लागवड केल्यावर त्यात तुम्ही तीळ, उडीद, मूग-हरभरा, गहू, जवस किंवा मोहरीची पिकं घेता येतात, त्यामुळे कमाई वाढेल.