Business Idea : वर्षभर भरघोस उत्पन्न देतात ‘हे’ व्यवसाय ; जाणून घ्या

business idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea : तुम्ही देखील नोकरी सांभाळत एखादा व्यवसाय करू इच्छित असाल किंवा पूर्णपणे तुम्हाला एखाद्या व्यवसायात उतरायची इच्छा असेल तर आज हा लेख तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्यवसाय करायचं म्हंटल तर नक्की कोणता व्यवसाय (Business Idea) करायचा ? त्यातही व्यवसाय असा असला पाहिजे ज्यातून बारा महिने उत्पन्न मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच बारमाही चालणाऱ्या काही व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया …

भाजीपाला विक्री व्यवसाय, किराणा दुकान, सामग्री लेखन व्यवसाय, youtube व्यवसाय, ब्लॉगिंग ,स्नॅप शॉप, ड्रायफ्रूट्स व्यवसाय, फळ व्यवसाय, व्हिडिओ एडिटिंग व्यवसाय, मोबाईल शॉपी चा व्यवसाय (Business Idea) असे हे काही व्यवसाय आहेत जे वर्षभर करता येतात आणि यातून चांगले उत्पन्नही मिळते.

मोबाईल शॉपी (Business Idea)

आपण असं म्हणू शकतो की अख्ख जग हे इवल्याशा मोबाईल मध्ये एकत्र आलेले आहे. प्रत्येकाकडे मोबाईल हा हमखास असतो. मोबाईल फोनची मागणी ही अधिक आहे या व्यवसायाद्वारे तुम्ही दर महिन्याला 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता. मात्र याच्या भांडवलासाठी तुम्हाला थोडेफार पैशांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जर तुम्ही मोबाईल रिपेरिंग चा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यासंबंधीतले काही कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत.

युट्यूब (Business Idea)

youtube हा असा एक व्यवसाय आहे ज्याद्वारे तुम्ही घरबसल्यांना लाखो रुपये कमवू शकता त्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंटेंट मध्ये निषणात असाल किंवा तुमच्याकडे काही कौशल्य असतील तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून youtube वर अपलोड करू शकता जर तुम्ही चांगले व्हिडिओ कंटेंट क्रियेटर असाल तर youtube चा वापर करून तुमची कौशल्य लोकांपर्यंत नेऊ शकता त्यातून चांगली कमाई करू शकता.

ब्लॉगिंग चा व्यवसाय

या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय तुम्ही पूर्ण वेळ किंवा तुमच्या सवडीनुसार करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार पैसे गुंतवण्याची गरज नाही फक्त तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग मिळवावे लागेल त्यानंतर तुम्ही ते सुरू करू शकता. जर तुम्हाला याबाबतीत माहिती नसेल तर तुम्ही youtube वरूनही याबाबत संपूर्ण (Business Idea) माहिती घेऊ शकता.

भाजीपाला आणि इतर व्यवसाय (Business Idea)

आपण नमूद केलेल्या इतर व्यवसायांबद्दल बोलायचं झालं तर भाजीपाला व्यवसाय हा बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे. आपण जाणतोच की कोरोना काळात सुद्धा हा व्यवसाय उत्तमरीत्या चालू राहिला. केवळ हा व्यवसाय नाशवंत घटकांशी जोडला गेला असल्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी थोडा अंदाज घ्यावा लागेल. तसंच ड्रायफ्रूट्स हा सुद्धा खूप चालणारा व्यवसाय आहे. याशिवाय फळ व्यवसाय, किराणा दुकान व्यवसाय हे सुद्धा बारामाही चालणारे चांगले व्यवसाय (Business Idea) आहेत.