Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पुजा संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 22 जानेवारीच्या शुभ दिवशी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pran Pratishtha) मोठया थाटामाटात पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधी पूर्वत श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर अयोध्येत पुष्पवर्षाव करण्यात आला.

आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ram Mandir Pran Pratishtha) गणेश पूजनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 12 वाजून 29 मिनिटांनी प्राण प्रतिष्ठा विधी पूर्ण झाला. 84 सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न करण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्ला साष्टांग नमस्कार केला. यावेळी संपूर्ण आयुर्वेद जल्लोषाचे वातावरण होते. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर राम मंदिरावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवर्षाव करण्यात आला.

दरम्यान, आज पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण अयोध्या फुलांनी सजवण्यात आली आहे. आजच्या या भव्य सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मंडळीसह कलाकार मंडळींनी अयोध्येत हजेरी लावली होती. यामध्ये, अभिनेत्री कांगणा राणावत अभिनेत्री आलिया भट, कतरिना कैफ, अभिनेता रणवीर कपूर, विकी कौशल, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा समावेश होता.

प्राणप्रतिष्ठेनंतर (Ram Mandir Pran Pratishtha) पंतप्रधान मोदींची प्रतिक्रीया

आयोध्यामध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल बोलतील. राम यांचा किती मोठा आशीर्वाद आहे की, आपण सर्वजण हा क्षण जगत आहोत आणि प्रत्यक्षात घडताना पाहत आहोत. आज मी प्रभू श्री राम यांची माफी मागतो. आपल्या प्रयत्नात, त्यागात आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी उणीव राहिली असावी, की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे की, प्रभू श्री राम माफ करतील.”