पुण्यात दिवसाढवळ्या व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पुण्यातील (Pune) जंगली महाराज रोड येथे भरदिवसा एका व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे सध्या पुण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. धीरज दिनेशचंद्र अरगडे असे संबंधित व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुपारच्या वेळी आपल्या कारमध्ये बसले असताना दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी दोन राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळीबार झाला नाही. हा सर्व प्रकार पाहून परिसरातील लोकांमध्येही गोंधळ उडाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या वेळी धीरज अरगडे हे आरगडे हाऊसच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या रस्त्यावरील आपल्या गाडीत बसले होते. याचवेळी, हेल्मेट घातलेले दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने त्याच्याजवळ येऊन गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु अरगडे यांना मारले नाही. यानंतर आरगडे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली, यामुळे हल्लेखोर शिवाजीनगर गावाच्या दिशेने पळून गेले.

महत्वाचे म्हणजे, हल्लेखोराने पळून जाताना धीरज अरगडे यांना धमकी दिली की ‘तुम्ही या वेळी वाचला परंतु पुढच्या वेळी नाही वाचणार’ दरम्यान, या घटनेनंतर आरगडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. आरगडे यांनी दिलेल्या माहितीवरूनच पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तसेच, आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.