Bussines Story Of Yongers |आजकाल अनेक असे तरुण आहेत जे त्यांची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे एक मोठा व्यवसाय म्हणून बघतात अनेक तरुणांच्या कहाणी आहे की त्यांनी त्यांचे करोडोचे पॅकेज सोडले आहे आणि स्वतःचा असा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. कारण आजकाल तरुणांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा स्टार्टअप उभा करणे जास्त फायद्याचं वाटतं. अशीच एक कहानी काही तरुणांची आहे. ज्यांनी त्यांचे करोड्याचे पॅकेज सोडले आणि स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. निकेत, अनुप्रिया, प्राची आणि रुपेश या नावाच्या तरुणांनी मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या सोडून मेरा पशु 360 नावाची कंपनी सुरू (Bussines Story Of Yongers) केलेली आहे.
यावेळी निकेत त्यांनी सांगितले की, देशात जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. या गाई- म्हशींचा दुधाचा व्यवसाय करून आज करोडो कुटुंबाला नफा मिळत आहे. परंतु गाई म्हशीच्या खरेदीत शेतकऱ्यांची आजकाल मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे. खरेदी करण्यापूर्वी अनेकवेळा एखाद्या म्हशीला दिवसाला वीस लिटर दूध आहे असे सांगण्यात येते. परंतु नंतर समजते की, ती म्हैस प्रत्यक्षात दिवसाला 5 लिटरही दूध घेऊ शकत नाही. अशावेळी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
तपासणीनंतर जनावरांची किंमत ठरवली जाते | Bussines Story Of Yongers
निकेत यांनी सांगितले की, त्यांची जी टीम आहे ती 75 पेक्षा जास्त पॅरामीटर्सवर प्राण्यांची तपासणी करते. आणि त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यानुसार त्यांची किंमत ठरवते. या चाचणीमध्ये प्राण्यांचे डोळे तपासले जातात, त्यांची उंची तपासली जाते. शिंगांचा आकार पाहिला जातो, त्याचप्रमाणे गाई किंवा म्हशी अशक्त आहेत की नाही हे देखील तपासले जाते.
आज आपण पाहिले तर 9 कोटींपेक्षा अधिक शेतकरी (Bussines Story Of Yongers) असे आहेत जे त्या शेतीला जोडून डेरी व्यवसाय करत आहेत. म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये डेरी व्यवसायाचा 5% पेक्षाही जास्त वाटा आहे. जगातील 25% दूध उत्पादन हे एकट्या भारतामध्ये होते. त्यामुळे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी हा स्टार्टअप सुरू केला तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.
प्राण्यांसाठी अन्न तयार करतात
निकेत आणि त्याची टीम प्राण्यांसाठी वेगवेगळे अन्न देखील तयार करतात. यामागे त्यांची एक वेगळी संकल्पना आहे. याबद्दल कनुप्रिया यांनी सांगितले की, गावातील जनावरांची जास्त काळजी ही फक्त महिलाच घेत असतात. परंतु बाजारात जाऊन भूसा आणायचा ही कामे मात्र पुरुष करतात. कारण स्त्रियांना बाजारात जाण्याची किंवा पैसे कमवण्याची जास्त परवानगी नाही. परंतु आता महिला घरात बसून ॲपद्वारे किंवा कॉल करून देखील सगळे ऑर्डर करू शकतात. या स्टार्टअपने आपल्या कॉल सेंटरमध्ये 40% पेक्षा जास्त महिला कर्मचारी ठेवलेल्या आहेत.
30 हजारांपेक्षा अधिक ग्राहक
त्यांचा स्टार्टअप पशु मेरा पशु 360 चे आत्तापर्यंत 30 हजारांपेक्षा अधिक ग्राहक झालेले आहेत. ही कंपनी आतापर्यंत साडेतीन हजार गावापर्यंत पोहोचलेली आहे. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला शेतकरी कुटुंबातील आहेत. त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांची देखील त्यांच्या स्थानिक भाषेत बोलतात. त्यांचा हा स्टार्टअप शेतकऱ्यांना केवळ फायद्याचाच नसून इतर अनेक महिलांना तसेच पुरुषांना त्यांच्या या कंपनीमध्ये त्यांनी काम देऊन रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध केलेली आहे. त्यांनीही कंपनी सुरू करून केवळ 2 वर्ष झालेली आहेत. परंतु ते आत्तापर्यंत 4 राज्यांमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांची ही प्रगती चालूच आहे.