Bussiness Idea | मित्रांनो होळी तोंडावर आलेली आहे. या होळीमध्ये तुम्ही कलर वापरून फक्त रंगच खेळू शकत नाही, तर रंगाचा व्यवसाय देखील करू शकत. अगदी कमी पैशात तुम्ही हा व्यवसाय करू शकता. यातून तुम्हाला 1 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. केवळ सात-आठ दिवसाच्या या सणानिमित्त तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. त्यामुळेच आता उत्तर प्रदेशातील कानपूर भागातील 18 रंग विक्रेते विविध शहरात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची दुकाने देखील मांडली आहे.
त्यांनी शहरात विविध ठिकाणी त्यांची दुकाने मांडलेली आहे. त्यांच्याकडे दहा ते शंभर रुपये तोळे म्हणजेच 1000 ते 10,000 रुपये किलो पर्यंतचे नैसर्गिक कलर उपलब्ध आहे. होळी साजरी करताना आपण रंगांचा वापर करतो. परंतु दुकानातील रंगांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेला त्याचप्रमाणे डोळ्यांना देखील इजा पोहोचू शकते. आणि या सगळ्यामुळे निसर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून या रासायनिक रंगाचा रंग वापर थांबवणे गरजेचे आहे. आता शहरात नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
सध्या बाजारात कोरडे रंग आणि पीचकरी तसेच विविध रंग यांसारख्या गोष्टींना मागणी वाढत आहे. होळीचा सण असतात बाजारात गर्दी देखील लागली आहे. त्यांपैकी आता महागाई वाढल्यामुळे अनेक गोष्टींची किंमत देखील वाढली आहे. लोक सध्या कोरड्या रंगाला जास्त प्राधान्य देत आहे. त्यामुळे बाजारात गडद रंग म्हणजेच गुलाबी,लाल,निळा, जांभळा, पिवळा या रंगाची आवक वाढली आहे. अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी त्यांची दुकाने मांडलेली आहेत
बाजारामध्ये सध्या 25 ते 1000 रुपये किलो प्रमाणे हे कोरडे रंग उपलब्ध आहेत. लाल रंगाच्या 25 किलो वजनाच्या बॅग्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही देखील असा हा एक व्यवसाय करून खूप चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही नैसर्गिक कलर विकत घेऊन याची विक्री करू शकता. आणि होळीच्या या आठवड्याभरातच खूप चांगली कमाई देखील करू शकता