Bussiness Idea | 1.50 लाखाची गुंतवणूक करून करा स्वतःचा व्यवसाय सुरु, महिन्याला होईल एवढी कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bussiness Idea मित्रांनो आजकाल सगळ्यांना छोट्या स्वरूपात का होईना, पण स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. नोकरी असली तरी साईड इन्कम म्हणून अनेक लोक छोटासा व्यवसाय सुरू करतात. आणि त्यातून त्यांना चांगला फायदा देखील मिळतो. जर तुम्ही देखील भविष्यात तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. कारण आम्ही तुम्हाला एका भन्नाट व्यवसायाची माहिती देणार आहोत. जो व्यवसाय बाराही महिने चालणार आहे आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले उत्पन्न देखील मिळणार आहे.

देशात कोरोनाचे संकट आल्यानंतर सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या होत्या. अनेक महिने लोक नोकऱ्या सोडून बिनपगारी घरी बसले होते. त्यावेळी सगळ्यांच्या मनात हाच विचार आला की, जर परत आयुष्यात असा प्रसंग आला तर त्याला कसे मात तोंड द्यायचे? यासाठी आता युवकांचा कल व्यवसायाकडे जास्त जात आहे. कारण लोक आता असा व्यवसाय शोधत आहेत, ज्याला कधीही मरण येणार नाही. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची (Bussiness Idea) माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये फक्त दीड लाख रुपये भांडवल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यातून खूप चांगला फायदा होईल.

कोणता आहे व्यवसाय ? | Bussiness Idea

आज आम्ही तुम्हाला बनाना पेपर मेकिंग या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. बाजारामध्ये अलीकडे केळीपासून बनवलेल्या पेपरला मोठी मागणी आहे. त्यामुळे हा बनाना पेपर मेकिंगचा व्यवसाय चांगला चालत आहे. हा बनाना पेपर मेकिंग प्लांट इस्टॅब्लिश करून तुम्ही लाख रुपयांची कमाई करू शकता. हा केळीचा कागद केळीच्या झाडाच्या सालापासून किंवा सालीच्या तंतूपासून तयार केला जातो. इतर कागदाच्या तुलनेत केळीच्या कागदात कमी घनता असते. त्याचप्रमाणे जास्त डिस्पोजेबिलिटी, हाय टेन्शन स्ट्रेंथ असते. त्यामुळे बाजारात या बनाना पेपरला मोठी मागणी आहे त्यामुळे या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

या व्यवसायाचा खादी तसेच ग्रामोद्योगायत आयोगाने एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागू शकते ? त्यातून किती कमाई होईल या सगळ्याचा अंदाज लावला आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार ?

या प्रोजेक्टनुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास 16 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये अनेक मशीनरी कच्चा माल, बिजनेससाठी लागणारे शेड, वर्किंग कॅपिटल यांसारख्या गोष्टींचा फायदा होतो. परंतु तुमच्याकडे जर एवढी अमाऊंट नसेल, तर तुम्ही केवळ एक लाख 65 हजार रुपयांची गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि उर्वरित 90% मी तुम्हाला फायनान्स देऊ शकते. म्हणजेच या व्यवसायासाठी लागणारी 90% रक्कम तुम्ही बँकेकडून कर्ज स्वरूपात घेऊ शकता. तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कमी इंटरेस्ट रेटवर 10 लाख रुपयांचे कर्ज मिळवू शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन काढावे लागणार आहे. यामध्ये तुमचा व्यवसाय रजिस्टर करावा लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाची जीएसटी नोंदणी, एमएस उद्योग ऑनलाईन नोंदणी, बीआयएम प्रमाणपत्र प्रदूषण विभागाकडून एनसीओ काढावी लागेल. त्याचप्रमाणे सर्व डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करता येणार आहे..

कमाई किती होणार ?

या व्यवसायाचे जर तुम्ही योग्य पद्धतीने मार्केटिंग केली तर तुम्ही दर वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करू शकता. म्हणजेच तुम्हाला महिन्याला 50000 रुपयांचा नफा या व्यवसायातून मिळू शकतो.