Bussiness Idea | ‘या’ उन्हाळ्यात सुरु करा आईस्क्रीमचा व्यवसाय, महिन्याला होईल बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bussiness Idea| आजकल अनेक तरुणांना स्वतःचा असा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु कोणता व्यवसाय सुरू करावा. त्यातून किती प्रॉफिट मिळेल? त्याचप्रमाणे भांडवल कसे मिळवता येईल? या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते व्यवसाय करत नाही. परंतु या उन्हाळ्यात जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक भन्नाट आयडिया आहे. ती म्हणजे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवसेंदिवस आईस्क्रीम पार्लरची संख्या देखील वाढत चाललेली आहे.

आईस्क्रीम ही केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात देखील खाल्ली जाते. कोणत्याही ऋतूमध्ये आईस्क्रीम सगळ्यांना खूप आवडते. यातून खूप चांगला फायदा देखील तुम्ही कमवू शकता. हे आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक देखील करावी लागत नाही यासाठी फ्रीजर विकत घ्यावा लागतो.

आईस्क्रीम व्यवसाय कसा सुरू करावा ? | Bussiness Idea

आईस्क्रीम व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला फक्त फ्रीझरची आवश्यकता असते. आईस्क्रीम उत्पादक कंपन्या बाजारामध्ये आहे. उत्तम दर्जाच्या आईस्क्रीम विकत घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. घरबसले तुम्ही कोणतेही दुकान भाड्याने घेऊन ही सुरुवात करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटेरियर फर्निचर फ्रिजर हे सगळे बसवावे लागेल. सोबत संपर्क विविध ब्रांडच्या आईस्क्रीम विकत घ्याव्या लागतील. यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक ते दोन लाख रुपयांचा खर्च होईल या ठिकाणी तुम्हाला दहा पाच ते दहा लोकांची बसण्याची व्यवस्था देखील करावी लागेल.

आईस्क्रीम व्यवसायासाठी परवाना घेणे गरजेचे

व्यापार संघटना FICCI ने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की 2022 पर्यंत देशातील आइस्क्रीम व्यवसाय एक अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल. तुम्हाला FSSAI कडून परवाना घेणे आवश्यक आहे. हा 15 अंकी नोंदणी क्रमांक आहे, जो येथे तयार केलेले खाद्यपदार्थ FSSAI च्या गुणवत्ता मानकांची पूर्तता करत असल्याची खात्री करतो.

आईस्क्रीमची मागणी

आईस्क्रीम ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. उन्हाळ्याच्या हंगामात, एखाद्या व्यक्तीला कमी पैशात लवकरात लवकर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आईस्क्रीम पार्लर हा एक चांगला पर्याय असू शकतो. हा व्यवसाय फक्त उन्हाळ्यातच चालेल असे नाही. आता हिवाळ्यातही आईस्क्रीम खाण्याची आवड वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायात कमाईची चांगली संधी आहे.