Bussiness Idea | सध्या सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक नवीन योजना देखील राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी या योजना असतात. शेतीतील विहीर तसेच कृषीपंप, घराच्या छतावर उभारण्यात आलेले सौर पॅनल यासाठी आता सरकारकडून अनुदान देण्यात देखील येत आहे. भविष्यात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर व्हावा. या दृष्टिकोनातून आता सरकारच्या माध्यमातून हे अतिरिक्त प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सौर ऊर्जा क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आता विकसित होऊ लागलेले आहेत.
त्यामुळे आता इथून पुढे सौरऊर्जेमुळे लोकांना रोजगाराची संधी देखील प्राप्त होणार आहे. तुम्ही सौर पॅनल किंवा संबंधित अनेक व्यवसाय करू शकता. त्यामुळे इतरांना देखील नोकरी मिळेल आणि त्यातून तुमची खूप आर्थिक प्रगती देखील होईल. आज आपण सौर पॅनल किंवा सौर ऊर्जेचे संबंधित काही महत्त्वाचे व्यवसाय (Bussiness Idea)पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून महिन्याला 40 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
सौर उत्पादने विक्रीचा व्यवसाय
सौर ऊर्जेचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे तुम्ही सौर उत्पादनाचा व्यवसाय सुरू करता करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला मदत मिळते तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला यामध्ये सुरुवातीला कमीत कमी 3 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. या व्यवसायामध्ये तुम्ही सोलार मॉड्युल सोलर थर्मल सिस्टीम सोलर कुकिंग सिस्टीम सोलर फॅन्सी गोष्टींचा व्यवसाय करू शकता. यामधून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.
सौर ऊर्जा उत्पादनाचा व्यवसाय | Bussiness Idea
तुम्ही सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे विकून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता. आज काल सौर उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामध्ये सोलार वॉटर हीटर, सोलार पंप, सोलार लाईट, सोलार मोबाईल, सोलार लॅम्प इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. या हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला सुरुवातीला एक ते पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.
सौर उपकरणे देखभाल आणि दुरुस्ती केंद्र
सौरभकरणांबाबतचा हा अत्यंत सोपा व्यवसाय आहे. यामध्ये तुम्हाला सौर उपकरणांची देखभाल स्वच्छता आणि साफसफाई केंद्र सुरू करायचे आहे. या व्यवसायात तुम्हाला अत्यंत कमी गुंतवणूक सुरू करता येईल. यामध्ये तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत करावी लागेल. तुम्हाला या व्यवसायातून दर महिन्याला वीस ते पस्तीस हजार पर्यंत नफा होईल.
सौर सल्लागार
तुम्हाला जर सौर ऊर्जा आणि सौर उत्पादनांची चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही सौर सल्लागार असा व्यवसाय देखील सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला सौर ऊर्जेची कार्यप्रणाली फायदे तोटे सोलार उत्पादकांची माहिती ग्राहकांना देणे खूप गरजेचे आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक ऑफिस आणि वेबसाईट असणे गरजेचे आहे. तुम्ही दर महिन्याला चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकता.