Bussiness Idea | ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. परंतु शेतीला जोडून अनेक जोड व्यवसाय केले जाते. त्यातील पशुपालन हा एक प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन करताना जनावरांच्या खाद्याला खूप जास्त पैसे लागतात. पशुपालनाच्या व्यवसायात जेवढा खर्च असतो, त्यातील 70 टक्के खर्च हा फक्त त्यांच्या चाऱ्यावर निघून जातो. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सहसा परवडत नाही.
त्याचप्रमाणे कधीकधी जनावरांना चांगल्या दर्जाचा चारा देखील मिळत नाही. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि अर्थातच दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे जर जनावरांचे दूध उत्पादन चांगले पाहिजे असेल, तर त्यांच्यासाठी चांगला आणि संतुलित चारा असणे खूप गरजेचे आहे. यासाठी आता अनेक लोक हा पशुखाद्याचा व्यवसाय देखील चालू करत आहेत.
पशुखाद्य निर्मिती व्यवसायामध्ये काय महत्त्वाचे? | Bussiness Idea
पशुखाद्य निर्मिती व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगले नियोजन करणे गरजेचे असते. यामध्ये कच्च्या मालापासून लागणारी सामग्री आवश्यक असणारे मजूर वाहतुकीचे साधन यांसारख्या गोष्टींचा पुरवठा असणे गरजेचे आहे. तसेच ही यंत्रसामग्री तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी विजेचे देखील गरज असते. त्यामुळे विजेची तुम्हाला सोय करावी लागते. त्या विजेवरही तुमचा खूप जास्त खर्च होतो.
जर तुम्हाला हा खर्च वाचवायचा असेल, तर तुम्ही सोलार पॅनलच्या माध्यमातून देखील हा खर्च वाचू शकता. या पशुखाद्याची साठवण करण्यासाठी तुम्हाला जवळपास 2000 ते 2500 चौरस फूट जागेची गरज असते. या जागे पैकी 1000 ते 1500 चौरस फूट जागा ही यंत्रांना लागते. तर उरलेली 900 ते 1000 फूट जागा ही कच्चामाल ठेवण्यासाठी लागते. यामध्ये तुम तुम्ही तांदूळ, गहू, हरभरा, मका, सोयाबीन यांसारखा कच्चामाल शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकता तुम्हाला स्वस्त दरामध्ये हा माल मिळेल. त्याच प्रमाणे या व्यवसायांमध्ये (Bussiness Idea) तुम्हाला हा चारा विकण्यासाठी वाहतूक लागते. त्याचप्रमाणे वीज पशुखाद्य पॅकिंग करण्यासाठी देखील खर्च लागतो.
भांडवल किती लागेल?
तुम्हाला जर एखादे पशुखाद्य निर्मिती युनिट सुरू करायचे असेल, तर तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये खर्च येतो. परंतु आता केंद्र सरकारच्या माइक्रो फूड इंडस्ट्रीज अपग्रेटेड या योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य तयार करण्याच्या युनिट स्थापन करण्यासाठी तुम्हाला 35 टक्याचे अनुदान देखील मिळते. हे पशुखाद्य विकण्यासाठी तुम्हाला जीएसटी नोंदणी करणे गरजेचे आहे. तुमचे तयार झालेले पशुखाद्य एखादा ब्रँड नावाने विकत असाल, तर तुम्हाला ट्रेडमार्क आणि त्यासोबत आयएसआय स्टॅंडर्ड नुसार बीआयएस प्रमाणपत्र घ्यावे लागते.