Bussiness Idea | अनेक लोकांना नोकरी सोबत व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु हा व्यवसाय नक्की कोणता करावा? बाजारात त्याला मागणी आहे का? या सगळ्याचा विचार करून अनेक लोकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे व्यवसाय करताना तो व्यवसाय नक्की कुठे सुरू करायचा? त्याचप्रमाणे त्याला भांडवल किती लागेल? या सगळ्या गोष्टींचा विचार येतो. परंतु आता तुम्ही अगदी कमीत कमी भांडवलामध्ये तुमच्या घराच्या छतावर व्यवसाय सुरू करून एक यशस्वी उद्योजक देखील बनवू शकता.
तुमच्या घराच्या छतावर बिजनेस सुरु केल्यानंतर तुम्हाला जागेचे भाडे देखील लागणार नाही. तसेच इतर खर्च देखील लागणार नाही. तुम्ही अगदी घरगुती काही व्यवसाय करून ते यशस्वी होऊ शकतात. आहे कोणते बिझनेस करता येईल, हे आपण जाणून घेणार आहोत.
टेरेस फार्मिंग | Bussiness Idea
सध्या टेरेस फार्मिंग हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही घराच्या छतावर शेती करू शकता. तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये काही फळांची झाडे, वनस्पती छतावर लावू शकता. तसेच तुम्ही भाज्यांचे पीक देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे पॉली बॅगमध्ये देखील भाज्यांचे बियाणे लावू शकता. छतावर तुम्ही माती पसरवून त्या प्रमाणात शेती करू शकता. यामध्ये तुम्हाला घरबसल्या चांगला फायदा मिळेल.
सोलर पॅनल
तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावून देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला जास्त वीज बिल देखील येणार नाही. आणि घरातील वीज देखील कमी वापरता येईल. या व्यवसायाने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
मोबाईल टॉवर
तुम्ही जर मोबाईल टॉवर साठी तुमच्या घराचे छत भाड्याने दिले, तर तुम्ही त्यातून चांगले कमाई करू शकता. मोबाईल कंपन्या या टॉवर लावण्यासाठी विविध जागा शोधत असतात. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर टॉवर लावण्यासाठी जागा दिली तर त्याचे तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळेल. तुम्हाला जर टॉवर लावून घ्यायचा असेल, तर तुम्हाला टॉवर ऑपरेटर कंपनीची संपर्क साधावा लागेल.
होर्डिंग किंवा बॅनर
आज काल रस्त्यावर होर्डिंग आणि बॅनर लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशातच तुम्ही छतावर होडींग किंवा बॅनर लावू शकता. यामुळे तुम्हाला चांगले पैसे देखील मिळते. परंतु हे होर्डिंग लावताना काही कायदेशीर गोष्टींचे पालन करावे लागेल. आणि त्यातून तुम्हाला भाडे मिळत राहील.