सरकारी योजनांच्या मदतीने होणार व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न साकार; होईल बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकांना पैशा अभावी व्यवसाय सुरु करणे कठीण जाते. अशा लोकांना पाठबळ मिळावे यासाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते. व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार 90% पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. या कर्जामुळे बऱ्याच जणांना व्यवसाय उभारताना येणारी आर्थिक अडचण दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे आणि सरकारच्या 90% कर्ज योजनेचा लाभ घ्याचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला असा व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच त्या व्यवसायातून लाखोंची कमाई करता येईल .

कृषी आधारित तांदूळ प्रक्रिया उद्योग

तुम्ही जर शेतीशी जोडलेले असाल तर कृषी आधारित तांदूळ प्रक्रिया उद्योग तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. तसेच तुम्ही तुमचा शेती व्यवसाय सांभाळूनही हा उद्योग सुरू करू शकतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे एक हजार चौरस फूट आकाराच्या शेडची असणे गरजेचे आहे. तसेच यासोबत डस्ट बॉयलरसह धान क्लिनर, पॅडी सेपरेटर, पॅडी म्हणजे तांदूळ डी हस्कर, तांदूळ पॉलिशशर तसेच कोंडा प्रक्रिया आणि एक्सपायरेटर इत्यादी यंत्रसामग्रीची देखील आवश्यकता असते. तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरु करून जास्त नफा कमाऊ शकता.

किती लाभ मिळेल

370 क्विंटल तांदळावर प्रक्रिया केल्यास सुमारे 4 लाख 45 हजार रुपयांचे उत्पादन होते. हे विक्रीसाठी उपलब्ध केल्यास एकूण विक्री सुमारे 5 लाख 54 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे या व्यवसायातून दर महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून तांदूळ प्रक्रिया उद्योगाचा विचार करावा. यामुळे कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळतो आणि आर्थिक स्थैर्यही वाढते.

3 लाख रुपये इतका खर्च

हा उद्योग सुरु करण्यासाठी तुम्हाला सुमारे 3 लाख रुपये इतका खर्च येतो. तसेच तुमच्याकडे खेळते भांडवल असावे यासाठी 50 हजार रुपयांची आवश्यकता असते. याचाच अर्थ कि तुम्ही साडेतीन लाखात हा व्यवसाय सुरु करू शकता , याचबरोबर जर तुम्ही सरकारी योजनेची मदत घेतली तर तुम्हाला 90% अनुदान मिळू शकते. तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.