काय सांगता ! इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी ?गडकरींनी सांगितला प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुण्यातील रस्तेमार्ग विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नितीन गडकरींनी यांनी इलेकट्रीक बस प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे’.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, “मुरलीधरजी मी आता नवा प्रोजेक्ट करतोय. टाटा कंपनीचं मी झेकोस्लोव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करुन दिलय.18 ते 40 मीटरची ही बस आहे, ती बस जेव्हा बस स्टॉपवर थांबेल तेव्हा अर्ध्या मिनिटांत 40 किमीची चार्जिंग करेल.बसमध्ये एक्झिक्युटीव्ह क्लास आहे, लॅपटॉप आहे. विशेष म्हणजे जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे.या बसमध्ये चहा-पानी, नाश्ता मिळेलच. पण, या बसचं तिकीट डिझेलच्या बसेसपेक्षा 30 टक्के कमी असणार आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमातून दिली.

इथेनॉलवर आधारित गाड्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये

पुढे बोलताना ते ,म्हणाले , या इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होत असून, त्यानंतर पुण्यातील रिंग रोडवर तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू करा, असेही गडकरी यांनी मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून म्हटले आगामी काळात पुण्याला प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत गडकरींनी मार्गदर्शन केले.