Butterfly Bridge : पवना नदीवरील फुलपाखरू पूल; पुणेकरांसाठी ठरलाय गेमचेंजर

Butterfly Bridge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड Butterfly Bridge: राज्यातील श्रीमंत महानगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फुलपाखरू पुलाचे उद्धघाटण झाले आहे. या पुलामुळे थेरगाव ते चिंचवड हा भाग एकमेकांना थेट जोडला गेला आहे,त्यामुळे चिंचवडची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल,अस प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

खरं तर प्रकल्पाचे काम २०१६ मध्ये सुरू झाले आणि सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते, परंतु कंत्राटदार वेळेवर काम पूर्ण करू शकला नाही. दरम्यान, प्रकल्पाचा खर्च २५ कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या निविदा रकमेवरून वाढून तो ३९.७५ कोटी झाला.यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. त्यात चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रकल्पाच्या किमतीवरून सुरुवातीच्या निविदा रकमेच्या तुलनेत १४% वाढ आणि त्यात अनियमितता असल्याचा आरोप जगताप यांनी उपस्थित केला. आमदार जगताप यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पाटबंधारे विभागाने शिफारस केलेल्या पुलाची उंची (Butterfly Bridge) वाढल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे, ज्यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाला.

फुलपाखरू पुलाची वैशिष्टये- Butterfly Bridge

फुलपाखरू पुलाचे वैशिष्टये पाहिली तर हा पूल तब्बल १०७ मीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंदीचा हा पूल असून,पुलाचे महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा पूल कोणत्याही आधाराशिवाय बांधला आहे. त्यामुळे हा अशाप्रकारच राज्यातील एकमेव पूल मानला जातोय. या व्यतिरिक्त वैशिठ्य पहिली तर या पुलामुळे थेरगाव आणि बिर्ला हॉस्पिटल लिंक रोडवरून चिंचवड आणि काळेवाडीला थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. यापूर्वी थेरगाव कडून चिंचवडला जाण्यासाठी मोरया गोसावी मंदिर किंवा चापेकर चौकातून लांब मार्गांनी जावे लागत असे आणि या दोन्ही मार्गावर खूप गर्दी होती. हे सगळ आता फुलपाखरू पुलामुळे थांबणार आहे.