Buttermilk Recipe : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळयात ताक, कैरीचे पन्हे , फळांचे ज्यूस असे हेल्दी ड्रिंक्स आवार्जाऊन घेतले जातात. हेल्थ च्या बाबतीत सेलिब्रेटी देखील थोडी जास्त काळजी घेताना दिसतात. आपला डाएट प्रॉपरली फॉलो करताना दिसतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील या सगळ्यात खूप (Buttermilk Recipe) जागरूक असते. ४८ वर्षीय शिल्पा तिच्याकडे पहिले तरी विशीतील तरुणीप्रमाणेच दिसते. तिच्या या चिरतरुण राहण्यामध्ये योगा आणि डाएट यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिच्या हेल्थ टिप्स बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. एका कार्यक्रमात बोलताना तिने ती घेत असलेल्या ताकाची खास रेसिपी सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया खास मसाला ताकाची (Buttermilk Recipe) रेसिपी
साहित्य
अर्धी वाटी दही, अर्धा टीस्पून, बडीशेप पावडर अर्धा टी जिरे पावडर, अर्धा कप (Buttermilk Recipe) कोथिंबीर पुदिन्याची आठ ते दहा पाने, एक वाटी पाणी, चवीनुसार मीठ आणि एक हिरवी मिरची
कृती (Buttermilk Recipe)
- सर्वात आधी बडीशेप आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर (Buttermilk Recipe) त्याची पूड करून घ्यायची आहे.
- आता कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्या.
- कोथिंबीर ,पुदिना बडीशेप जिरे पूड ,मिरची हे सर्व मिश्रण वाटून घ्या
- हे मिश्रण आता गाळून घ्या आता ब्लेंडर मध्ये दही (Buttermilk Recipe) आणि पाणी घालून फिरवून घ्या
- त्यामध्ये वरील मिश्रण आणि मीठ टाका.
- आता झटपट तयार होईल मसाला ताक