हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या बाजारात सुरू असलेली गाड्यांची क्रेझ पाहून प्रत्येकालाच वाटते की, आपल्याकडेही एखादी कार असावी. परंतु अधिक किमतींमुळे चांगली कार घेणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळेच आता कमी किमतीत चांगली कार घेण्याची संधी Hyundai ने आपल्या ग्राहकांना दिली आहे. नको तीच हुंडाईने आपल्या Verna कारवर बंपर ऑफर जाहीर केली आहे. ही कार तुम्ही एकदा 31 मार्चपर्यंत कमी किमतीत खरेदी करू शकता. तिथून पुढे तुम्हाला या कारसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.
2024 मध्ये बाजारात सर्वाधिक हुंडाईची Verna कार विकली गेली आहे. त्यामुळेच कंपनीने या कारवर विविध प्रकारच्या ऑफर देऊ केले आहेत. या ऑफर मध्ये तुम्हाला थेट तीस हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय 25 हजारांचा एक्सचेंज बोनस ही दिला जात आहे. या दोन्ही गोष्टींचा तुम्ही एकत्र लाभ घेतला तर तुमचे 55,000 हजार रुपये वाचतील. कारण होळीच्या निमित्त सर्व टॅक्स कंपन्या अधिक चांगल्या ऑफर्स प्रदान करीत आहेत.
Verna कारचे फीचर्स पहा
हुंडाईची Verna कार तुम्हाला 18 ते 20 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. यासह कारमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला लेव्हल 2 एडीएएस, सनरूफ, एलईडी डीआरएल, कनेक्टेड हेडलॅम्प, हवेशीर जागा, क्रूझ कंट्रोल अशा सर्व सुविधा मिळून जाईल. याबरोबर, एअर बॅग, मनोरंजन प्रणाली, आयएसओ फिक्स्ड चाइल्ड सेफ्टी लॉक देखील कंपनीकडून कारमध्ये देण्यात आले आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कमी किमतीत ही कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते.
किंमत
खास म्हणजे, Verna कारच्या सर्व प्रकारांमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग मिळतील. याशिवाय या वाहनाला इलेक्ट्रॉनिक नियंत्रण, पार्किंग असिस्ट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, सर्व 4 डिस्क ब्रेक (फक्त टर्बो), इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (फक्त टर्बो), अशा सर्व गोष्टीही उपलब्ध असतील. तसे पाहिले गेले तर, भारतामध्ये या कारची किंमत 11 लाखांच्या पुढे सुरू होत आहे परंतु 31 मार्चपर्यंत सुरू असलेल्या ऑफरमध्ये ही कार तुम्हाला फक्त 55 हजार रुपयांमध्ये बसेल.