हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ॲपल आयफोन (Apple iPhone खरेदी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते. Apple च्या सर्वात परवडणाऱ्या आयफोन 16e ची प्री-बुकिंग 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. हा फोन 28 फेब्रुवारीपासून अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनवर आकर्षक बँक ऑफर्स, नो-कॉस्ट EMI आणि ट्रेड-इन ऑफर मिळणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना स्वस्तात नवीन आयफोन खरेदी करता येईल.
किमती आणि ऑफर्स
iPhone 16e चा 128GB व्हेरिएंट 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 256GB मॉडेलसाठी 69,999 रुपये मोजावे लागतील. यासह सर्वात मोठा 512GB व्हेरिएंट 89,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनला ग्राहक नो-कॉस्ट EMI मार्फत फक्त 2,496 रुपये प्रति महिना भरून खरेदी करू शकतात. मात्र, ही ऑफर केवळ निवडक बँक कार्डांवरच उपलब्ध आहे. याशिवाय, Apple च्या ट्रेड-इन स्कीम अंतर्गत जुन्या आयफोनच्या बदल्यात 5,000 ते 67,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
iPhone 16e फीचर्स
iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. जो 60Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. यामध्ये Apple चा नवीन A18 चिपसेट देण्यात आला आहे, जो Apple Intelligence ने सुसज्ज आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी 48MP चा रियर कॅमेरा असून, त्यात 2x टेलिफोटो झूम सपोर्ट देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP चा TrueDepth फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
दरम्यान, नवीन iPhone 16e खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Apple Music, Apple TV+ आणि Apple Arcade या सेवांचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तसेच, फोनच्या सुरक्षेसाठी ग्राहक Apple Care Plus कव्हर घेऊ शकतात. स्वस्तात नवीन iPhone घ्यायचा असेल, तर iPhone 16e हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीपासून हा फोन अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध होईल.




