फ्लिपकार्ट सेलमध्ये Samsung Galaxy S24+ खरेदी करा स्वस्त दरात; जाणून घ्या ऑफर्स आणि फीचर्स

0
3
Samsung Galaxy S24+
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सॅमसंग स्मार्टफोनच्या त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Samsung ने अलीकडेच आपल्या नवीन फ्लॅगशिप सिरीज Galaxy S25 लाँच केली आहे. या नव्या सिरीजमुळे सॅमसंग कंपनीने मागील सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. यातीलच एक भाग म्हणून सध्या Samsung Galaxy S24+ 5G हा स्मार्टफोन Flipkart सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात या फोनची खरेदी करत आहेत.

Samsung Galaxy S24+ 5G मोठी सूट

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये Samsung Galaxy S24+ 5G स्मार्टफोन 63,430 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. विशेष म्हणजे, याच्या मूळ किमतीत 4,569 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

बँक ऑफर आणि एक्सचेंज डील्स

जर तुम्ही HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला अतिरिक्त 5,500 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, हा फोन EMI प्लॅनमध्ये 3,106 रुपये प्रतिमहिना या हफ्त्यांमध्येही खरेदी करता येईल. कंपनीकडून एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. परंतु त्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.

Samsung Galaxy S24+ 5G चे दमदार फीचर्स

हा स्मार्टफोन 6.7 इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यामध्ये डेका-कोर प्रोसेसर दिला आहे, जो हाय-परफॉर्मन्ससाठी उत्तम ठरतो. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S24+ 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यासोबत LED फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4000mAh बॅटरीसह येतो, जी 29 तास व्हिडिओ प्लेबॅक आणि 78 तास ऑडिओ प्लेबॅक देऊ शकते.