हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sovereign Gold Bonds) आजकाल सोने खरेदीचा नुसता विचार जरी मनात आला तरीही घाम फुटतो. सोन्याच्या दररोज वाढणाऱ्या दरांनी एकीकडे आभाळाला हात टेकले आहेत. अशातच सोने खरेदीवर सवलत असे शब्द कानावर पडले किंवा वाचण्यात आले तर एक वेगळाच आनंद होतो. असाच आनंद तुम्हाला मोदी सरकार देत आहे. होय. मोदी सरकार देतंय ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची संधी. कधी? कुठे? आणि कशी खरेदी करायची? असे प्रश्न पडले असतील ना? चला तर जाणून घेऊयात अधिक माहिती.
सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) (Sovereign Gold Bonds)
मित्रांनो, आपण ज्या सोन्याविषयी बोलत आहोत त्याची खासियत सांगायची झाली तर हे सोनं कोणताही चोर चोरू शकत नाही. कारण, आपण सॉवरेन गोल्ड बाँडविषयी (SGB) बोलत आहोत. होय. आजपासून सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) अर्थात सार्वभौम सुवर्ण रोखे विक्री सुरु करण्यात आली आहे. आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ पासून येत्या शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ही विक्री सुरू राहणार आहे. म्हणजेच आजपासून पुढील ५ दिवसांत तुम्ही गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकणार आहात.
इश्यू किंमत किती?
या २०२३- २४ आर्थिक वर्षातील सुवर्ण रोख्यांची ही चौथी मालिका आहे. ज्यामध्ये आरबीआयने (RBI) सॉवरेन गोल्ड बाँडची (SGB) इश्यू किंमत ६,२६४ रुपये प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे. अर्थात १० ग्रॅम सोन्यासाठी ६२,६३० रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. (Sovereign Gold Bonds)
ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री सुरु
सॉवरेन गोल्ड बाँडची ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ऑफलाईन स्वरूपात गुंतवणूक करायची असेल तर त्याला नियुक्त बँक शाखेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. तसेच ज्या व्यक्तीला ऑनलाईन स्वरूपात गुंतवणूक करायची असेल त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा इतर बँकांच्या वेबसाइटद्वारे खरेदी अर्ज करावा.
कुठे कराल खरेदी?
RBI ने सॉवरेन गोल्ड बॉंडच्या विक्रीसाठी SBI, PNB, HDFC आणि ICICI बँकशिवाय पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टॉक एक्सचेंज NSC आणि BSC यासह निवडक बँकांना अधिकृत अधिकार प्रदान केले आहेत. (Sovereign Gold Bonds) यामध्ये, स्टॉक एक्स्चेंजद्वारे बॉण्ड खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
एकावेळी किती खरेदी करता येईल?
सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना किमान १ ग्रॅम सोने खरेदी करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, कोणताही गुंतवणूकदार एकावेळी फक्त ५०० ग्रॅमपर्यंतचं सॉवरेन गोल्ड बॉंड खरेदी करू शकतो.
ऑनलाइन खरेदीवर मिळणार सवलत
सॉवरेन गोल्ड बॉंडच्या विक्रीसाठी RBI ने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा सुरु ठेवल्या आहेत. मात्र, यांतील ऑनलाईन पर्यायाचा वापर करणाऱ्या गुंतवणूकदारांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे. (Sovereign Gold Bonds) ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँड खरेदीसाठी अर्ज करणाऱ्या तसेच पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सवलतीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच १० ग्रॅम सोने खरेदीवर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. यानुसार, ऑनलाईन गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत ६,२१३ रुपये प्रति ग्रॅम असेल.
ऑनलाइन अर्ज कसा करालं?
सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर खालील पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.
1) नामनिर्देशित बँकेच्या वेबसाइटवर जा.
2) मुख्यपृष्ठावर किंवा ई-सेवा विभागात उपलब्ध असलेला सॉवरेन गोल्ड बॉंडचा पर्याय निवडा.
3) गोल्ड बाँडशी संबंधित आवश्यक अटी – शर्ती पूर्ण वाचून आणि समजून घ्या.
4) अटी वाचल्यानंतर नोंदणी फॉर्म उघडेल तो व्यवस्थित भरा.
5) फॉर्म भरल्यानंतर सोन्याचे प्रमाण आणि नॉमिनीचा तपशील नमूद करा.
6) पुन्हा एकदा सर्व माहितीची पडताळणी करा.
7) माहिती तपासून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
8) यानंतर पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर ती बँक तुम्हाला गोल्ड बॉंड्स जारी करेल. (Sovereign Gold Bonds)