काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात, आगे आगे देखीए होता है क्या; देवेंद्र फडणवीसांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या संपर्कात काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आला आहे.

आगे आगे देखीए, होता है क्या..

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ” सध्या भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. यात काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतय मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या”

त्याचबरोबर, ” आता अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे” असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात अशोक चव्हाण आपल्या नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे पुढे जाऊन अशोक चव्हाण आणि काँग्रेस मधल्या आणखीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर याचा मोठा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आहे.