हुबळी : जे CAA च्या विरोधात आहेत ते दलित विरोधी आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. CAA च्या समर्थनार्थ अमित शहा कर्नाटकातील हुबळी येथे बोलत होते. त्यावेळेस बोलताना त्यांनी काँग्रेसवर तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी म्हंटले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणार्यांना मला विचारायचे आहे की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या दलितांविरुध्द जाऊन तुमचा काय फायदा होईल? जे सीएएला विरोध करतात ते दलित विरोधी आहेत.
Union Home Minister Amit Shah in Hubli: I want to ask those opposing Citizenship Amendment Act, what will you gain by going against dalits who have come from Pakistan, Bangladesh and Afghanistan? Those who are opposing CAA are anti-dalits. #Karnataka pic.twitter.com/Zvv9DoTAMA
— ANI (@ANI) January 18, 2020
काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये काय नाते आहे?
अमित शहा यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हंटले की, राहुल गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष दोघेही ३७० कलम काढून टाकायला विरोध करतात. दोघेही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करतात. मला कळत नाही की काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये काय नातं आहे. राहुल बाबाचे आजोबा चूक करून गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३७० कलम हटवून ती चूक सुधारली.