लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात लागू होणार CAA; अमित शहांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी CAA लागू करण्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. “येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात CAA लागू केले जाईल” अशी माहिती आम्ही शहा यांनी दिली आहे. अमित शहा यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच, “आम्हाला CAA लागू करण्यापासून कोणी रोखू शकत नाही” असे अमित शहा यांनी म्हणले होते.

CAA लागू करण्याचा उद्देश काय?

एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना अमित शहांनी सांगितले की, “CAA लागू झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेण्यात येणार नाही. याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणीस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता असा आहे” पुढे बोलताना, “जेव्हा देशाची फाळणी झाली त्यावेळी अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, त्यावेळी काँग्रेसने सांगितले होते की तुम्ही भारतात या तुम्हाला आम्ही नागरिकत्व देऊ” असे काँग्रेसने दिलेल्या वचनाची आठवण अमित शहा यांनी करून दिले.

त्याचबरोबर, “आमच्या मुस्लिम बांधवांची CAA बाबत दिशाभूल केली जात आहे. CAA पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकारने, लागू केलेल्या CAA चा उद्देश हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देणे आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे” अशी माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली.