#CAA_PROTEST, हिंसक आंदोलनामुळे रेल्वेचे 80 कोटींचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने जाळपोळीसारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम बंगाल, ईशान्यकडील काही राज्यात रेल्वेच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यांमुळे रेल्वेला जवळपास ८० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, विनोदकुमार यादव यांनी दिली आहे.

 

८० कोटींपैकी पूर्व रेल्वेचे ७० कोटी आणि उत्तरेकडील रेल्वे विभागाचे १० कोटी नुकसान झाल्याची माहिती विनोदकुमार यादव यांनी दिली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अजूनही आंदोलने सुरूच आहेत. काही राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने सार्वजनिक मालमतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंतप्रधान मोदी यांनी मला जाळा, पण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका असे आवाहन केले होते.

 

Leave a Comment