पुण्यात मेट्रोचे जाळे होणार भक्कम ; मंत्रिमंडळ बैठीकीत नव्या 2 मार्गांना मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुण्यात मेट्रो दाखल झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास सुखकर होताना दिसत आहे. नुकतेच पुण्यातल्या स्वारगेट मेट्रोचे देखील पुण्यात धमाकेदार स्वागत झाले असताना आता पुण्यातील आणखी दोन नव्या मार्गावर मेट्रोकची चाके धावणार आहेत. आज (14) राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातील मेट्रो विस्ताराला मान्यता देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती …

या मार्गावर सुरु होणार मेट्रो

पुण्यामध्ये खडकवासला -स्वारगेट- हडपसर- खराडी आणि नळ स्टॉप- डहाणूकर कॉलनी -वारजे- माणिक बाग या दोन नव्या मार्गांना माहिती सरकारनं कॅबिनेट बैठकीमध्ये आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे शहरातील मेट्रोचे जाळ अधिकच भक्कम होणार आहे.

मंत्रिमंडळात झालेल्या या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. आज सह्याद्री अतिथी गृह इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या निर्णयामध्ये पुणे मेट्रो संदर्भातील निर्णय घेण्यात आला असून मेट्रोच्या या नव्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

राज्यातील दुसरे महत्वाचे शहर असलेल्या पुण्यामध्ये लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील काही प्रमुख रस्यावर वाहतूक कोंडी होते. यामध्ये खराडी, नागररोड ,हिंजवडी , कोरेगाव पार्क अशा भागांसह इतरही भागांचा समावेश आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका तर होणारच आहे. शिवाय प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.