Monday, February 6, 2023

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात जोरदार स्वागत

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच आज साताऱ्यात आले. यावेळी त्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले. आ. देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करत फटाक्याची अतिषबाजी केली.

- Advertisement -

पाटण मतदार संघाचे विद्यमान आ. शंभूराज देसाई यांचा शिंदे- भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी समावेश झाला आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभूराज देसाई आज सातारा येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रथम छ. शिवाजी महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या विजयनगर ते दाैलतनगर जल्लोषी मिरवणूक

आ. शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाल्याने पाटण विधानसभा मतदार संघात जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी उद्या सकाळी 10 वाजता विजयनगर येथे कार्यकर्ते जमणार आहेत. मंत्री श्री. देसाई यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ- मोठे बॅंनर लावण्यास सुरूवात केली आहे.