व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढलं! कॅमरुन ग्रीनच्या हाताला गंभीर दुखापत

मेलबर्न: वृत्तसंस्था – मुबई इंडिअन्सच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला होता. या लिलावात मुबई इंडिअन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीनला (cameron green) 17.5 कोटी रुपये किंमतीला खरेदी केले होते. त्याच्या वर्ल्डकपमधील कामगिरीच्या जोरावर त्याला एवढी किंमत मिळाली आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो (cameron green) दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे.

आता मुंबई इंडियन्स आणि कॅमरुन ग्रीनच्या (cameron green) चाहत्यासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. बॉक्सिंग डे च्या दुसऱ्यादिवशी कॅमरुन ग्रीनला दुखापत झाली आहे. एनरिक नॉर्खियाचा एक वेगवान चेंडू त्याच्या बोटांना लागला आणि हि दुखापत झाली. हा चेंडू लागल्यानंतर ग्रीन अक्षरक्ष: वेदनेने कळवळु लागला. जेव्हा त्याने आपल्या हातातील ग्लोव्हज काढले, त्यावेळी त्याच्या बोटांमधून रक्त येत होतं. यानंतर त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

कॅमरुन ग्रीनला (cameron green) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरुन थेट रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्या बोटांच स्कॅनिंग होणार आहे. कदाचित तो या कसोटी सामन्यात पुढे खेळणार नाही. त्याची दुखापत खूप गंभीर आहे. इनिंगच्या 85 व्या ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीनला हि दुखापत झाली. ग्रीनने ग्लोव्हज काढले, त्यावेळी त्याच्या बोटातून भळाभळा रक्त वाहत होते.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!