Cancer Risk In Employees | आजकाल प्रत्येकजण नोकरी करत असतो. आणि या धावपळीत त्याचा शारीरिक आणि मानसिक तणाव वाढवत असतो. आपल्या देशामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त लोक आजकाल नोकरी करतात. आणि त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल की, आत्तापर्यंत केलेल्या रिसर्चमध्ये जे लोक नोकरी करतात. त्यांच्या मध्येच कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर आलेली आहे.
नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या अभ्यासात असे आढळून आली आहे की, एक कर्मचारी मेटाबोलिझ सिंड्रोम या रोगाने त्रस्त आहे. आणि यामुळे जास्तीत जास्त लोकांना कर्करोग होतो. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत
मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय?
मेटाबॉलिक सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे जी 45 वर्षाखालील लोकांमध्ये जर आढळली तर ते 65 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याचा धोका दुप्पट वाढतो. हा आपल्या शरीरात आजार वाढवतो. शरीरातील आजार वाढेल अशी तो स्थिती निर्माण करतो. म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल यांच्या एकत्रित स्वरूपाला मेटाबॉलिक सिंड्रोम असे म्हणतात. त्यामुळे याचा जर आपल्या शरीरात जास्त प्रभाव झाला तर आपल्याला कर्करोग आणि पक्षाघाताचा देखील धोका असतो.
ICMR यांनी कसा अभ्यास केला
ICMR अंतर्गत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी तीन मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांवर हा अभ्यास केलेला आहे. ज्यामध्ये जवळपास सर्व कर्मचारी हे 30 वर्षापेक्षा कमी वयाचे होते. या तपासणीनंतर असे अजून आले की, प्रत्येक दुसरा कर्मचारी हा एक तर जास्त वजनाचा आहे. किंवा पूर्णपणे लठ्ठआहे आणि दहा पैकी सहा कर्मचाऱ्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवून आली L. जी भविष्यात जाऊन त्यांना आजाराशी चार हात करायला लावणार आहे.
तरुणांमध्ये कोणकोणते रोग आढळले.
या तपासणी दरम्यान 44 टक्के कर्मचारी जास्त वजनाच्या आढळले तर 16.65 टक्के लोकही पूर्णपणे लठ्ठ होती तसेच 3.89% लोकांना मधुमेह झाला होता तर ६४.९३ टक्के लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण होते.
कर्करोगाचा धोका का वाढत आहे | Cancer Risk In Employees
या सगळ्या अभ्यासावरून असे समोर आले आहे की, आयटी आणि बिझनेस प्रोसेस सारख्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त नोकरदार तरुण आहे. परंतु येथील कामाच्या ठिकाणी अन्न आणि हवेची गुणवत्ता यांचा समावेश एमडीपीआय या वैद्यकीय जर्नलमध्ये करण्यात आला आहे. ज्याला इम्पॅक्ट ऑफ डिसिज अँड न्युट्रिशनल डीसऑर्डर ऑन ओक्यूपेशनल हेल्थ असे म्हणतात.