Cancer Treatment : भारतीय संशोधकांच्या प्रयत्नांना यश; स्वदेशी CAR-T थेरपीद्वारे पहिला रुग्ण ‘कॅन्सरमुक्त’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cancer Treatment) कॅन्सर अर्थात कर्करोग हा एक रोग नव्हे तर जगासमोरील एक भयंकर जीवघेणी समस्या आहे. आज कित्येक लोक कर्करोगाने ग्रासलेले आहेत. तर हजारो लोक दरवर्षी कर्करोगाने बळी जातात. कर्करोग हा कुणालाही, कशीही आणि कशामुळेही होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाची एक वेगळी जनमानसांत एक वेगळी दहशत आहे. आपल्याला कर्करोग आहे हे वेळीच न समजल्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र आता विज्ञानाने कर्करोगावर मात करण्यासाठी एका नव्या थेरेपीचा शोध लावला आहे.

जगभरात अनेक लॅब्समध्ये कॅन्सर बरा करण्यासाठी उपचारपद्धती शोधली जात असताना भारतीय संशोधकांनी निर्माण केलेल्या CAR-T Cell Therapy (सीएआर-टी सेल थेरपी) च्या माध्यमातून पहिला रुग कॅन्सरमुक्त झाल्याचे समोर आले आहे. भारतीय CAR-T सेल थेरपीच्या उपचारांमूळे हा रुग्ण कॅन्सरमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Cancer Treatment) दिल्लीतील गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्ट डॉ. (कर्नल) व्ही. के. गुप्ता हे CAR-T सेल थेरपीद्वारे कॅन्सरमुक्त घोषित झालेले पहिले रुग्ण ठरले आहेत. कॅन्सरविरुद्ध लढाईत भारतीय संशोधकांच्या प्रयत्नांना आलेले यश ही मोठी आनंदाची बाब आहे.

कर्नल डॉ. गुप्ता यांच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली. एका वृत्तानुसार, कर्नल डॉ. गुप्ता यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ते कॅन्सरच्या पेशींपासून पूर्णपणे मुक्त झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या आजीवन बरे होण्याचा दावा करणे अकाली आहे. असे असले तरीही सध्या ते कॅन्सरच्या पेशींपासून मुक्त असल्याचे, डॉक्टरांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, कर्नल डॉ. गुप्ता हे या थेरेपीद्वारे कर्करोगमुक्त होणारे पहिले रुग्ण ठरले आहेत. (Cancer Treatment)

दरम्यान असा दावा केला जातोय की, ही थेरेपी असंख्य रुग्णांसाठी जीवनरक्षक बनली आहे. ज्यामध्ये गुप्ता यांचा समावेश झाला आहे. डॉ. गुप्ता हे भारतीय लष्करात २८ वर्ष कार्यरत होते. भारतात या थेरेपीसाठी त्यांनी ४२ लाख रुपये मोजल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विदेशात याच थेरेपीसाठी किमान ४८०,००० डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार ४ कोटी रुपये घेतले जातात.

(Cancer Treatment)काही महिन्यांपूर्वीच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) यांच्याकडून स्वदेशी CAR-T सेल थेरेपीच्या व्यावसायिक वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. या थेरेपीत कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी रुग्णाच्या इम्यूनिटीवर काम केले जाते. या थेरेपीद्वारे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती ही अनुवांशिकरित्या पुनर्निर्मित केली जाते. आजपर्यंत अनेक संशोधकांनी विविध प्रयोग केले. मात्र त्यांच्या हाती कायम निराशा आली. अशातच भारतीय संशोधकांच्या CAR-T Cell Therapy वरील संशोधनाला मिळालेले यश हे चेतना आणि आशा निर्माण करणारे ठरले आहे.