ऐकावं ते नवलच! लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची थेट रेड्यावरून एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) कामाची लगबग सुरू आहे. यात विविध पक्षांचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. परंतु या नेत्यांऐवजी सध्या एका वेगळ्याच उमेदवाराची चर्चा राज्यात रंगली आहे. कारण, हा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गाडीत नाही तर चक्क रेड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळाले आहे. या उमेदवारांने केलेल्या हटके एंट्रीमुळे माढा मतदारसंघात चांगलाच चर्चेत आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राम गायकवाड (Ram Gaikwad) असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी अपक्ष गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क रेड्यावर बसून आले. त्यांची ही हटके एन्ट्री पाहून सर्वजणच चकित झाले. इतकेच नव्हे तर, राम गायकवाड अर्ज दाखल करण्यासाठी यमाचा पोशाख ही घालून आले होते. ज्यामुळे सर्वांचेच लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. अखेर त्यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

माढा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले राम गायकवाड हे मूळचे पंढरपुरचे आहेत. त्यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे, हा मुद्दा घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले होते, “देशामध्ये बोकाळलेला भ्रष्ट्राचार संपला पाहिजे. OBC तून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सामान्यांना नेते घाबरत नाहीत. त्यामुळे नेते यमाला घाबरतील म्हणून मी अशा रूपात आलो आहे”