लोकसभेसाठी ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर; पहा कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांच्या शिवसेनेकडून १७ जागांसाठी उमेदवारी यादी (Candidate List 2024 Lok Sabha) जाहीर करण्यात आली आहे . शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर हि नावे जाहीर केली आहेत . यामध्ये सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. सांगलीमध्ये पैलवान चंद्रहार पाटील याना तिकीट देण्यात आले आहे.

संजय राऊत यांचे ट्विट काय ?

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे आहे असं ट्विट करत संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ठाकरे गटाकडून कोणाकोणाला उमेदवारी –

रायगड – अनंत गीते
रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
परभणी – संजय जाधव
बुलढाणा नरेंद्र खेडेकर,
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
मावळ संजोग वाघेरे
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील- आष्टीकर
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
नाशिक – राजाभाऊ वाजे
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
वायव्य मुंबई – अमोल कीर्तिकर
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई