वडगाव हवेली ग्रामपंचायतीत सत्तांतर; भोसले समर्थक जगदीश जगताप यांचे वर्चस्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या वडगाव हवेली येथे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून याठिकाणी डॉ. अतुल भोसले समर्थक असलेल्या कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या गटाने बाजी मारली आहे. जगताप याच्या गटाचे सरपंचासह 11 उमेदवार विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले.

कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांचे समर्थक राजेंद्र जगताप हे निवडणुकीत सरपंचपदी निवडून आले आहेत तर दादासो जगताप, भारती साळुंखे, सचिन चव्हाण, सुषमा मदने, सविता साळुंखे, वनिता जगताप, सूक्षम गोतपागर, कौसर शिकलगार, अनुराधा मुळे, अनिता जगताप हे उमेदवार सदस्यपदी निवडून आले आहेत.

वडगाव हवेली ग्रामपंचायत निवडणुकीत जगदीश जगताप यांच्या गटाविरोधात विरोधी गटातून लोकशाही आघाडीतील उमेदवार राजेंद्र थोरात, जयवंत जगताप, प्रशांत काटवटे, शारदा पाथ सुपे आणि प्रकाश थावरे हे उमेदवार निवडून आले. तर या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते समर्थक सुधीर जगताप पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसचे नेते बंडानाना जगताप यांचे पुत्र सुरज जगताप सरपंच पदासाठी अपक्ष उभे राहिले होते मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.