हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अगरबत्ती, मेणबत्ती आणि धूपबत्ती बनविण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरेल . फक्त 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे सरकारकडून या व्यवसायाला प्रशिक्षण मिळत असल्यामुळे तुम्ही या व्यवसायाचे सर्व बारकावे शिकू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरी बसूनही करू शकत असल्यामुळे ,अनेक महिला या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटी मिळालेली आहे. तर चला जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती.
महिलांसाठी फायदेशीर –
या व्यवसायात अनेक महिला जोडलेल्या असून , प्रथम बाजारातून कच्चा माल आणला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन पक्का माल तयार केला जातो. एका किलो मोमापासून 20 ते 25 पॅकेट मेणबत्या तयार होतात. अगरबत्ती बनवण्यासाठी एका किलो कच्च्या अगरबत्तीपासून 30 ते 35 पॅकेट तयार होतात. तसेच महिलांनी परफ्यूम टाकून अगरबत्तीला आकर्षक बनवल्यानंतर ती पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. या व्यवसायातून महिला महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.
कमी खर्चात दुप्पट नफा –
हा व्यवसाय कमी खर्चात दुप्पट नफा देणारा आहे. मोमबत्ती बनवण्यासाठी एका पॅकेटवर 10 ते 15 रुपये खर्च येतो, तर ती बाजारात 20 ते 25 रुपयांना विकली जाते. त्यामुळे त्यांना एका पॅकेटवर 10 रुपये नफा मिळत असतो. तसेच रंगीत आणि आकर्षक मोमबत्त्यांना बाजारात अधिक मागणी असून त्याची किंमतही जास्त मिळते. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करणे फायदेशीर ठरू शकते.
व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टी –
तुम्ही जर हा व्यवसाय सुरु करणार असाल तर सर्वप्रथम त्या व्यवसायाची पूर्ण माहिती काढून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कच्चा माल जसे की मोम, अगरबत्तीची स्टिक्स, परफ्यूम, साचे, आणि पॅकिंग साहित्य बाजारातून खरेदी करावे लागेल . तसेच तयार माल विकण्यासाठी थेट विक्री, किरकोळ दुकाने किंवा ऑनलाइन माध्यमांचे साहाय्य घ्यावे . जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठ्या कमाईचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगरबत्ती, मोमबत्ती आणि धूपबत्तीचा व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय तुम्हाला आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाईल .