कोरोनाच्या आणखी किती लाटा येणार सांगू शकत नाही : तात्याराव लहाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. देशात दररोज तीन लाखांच्या घरात कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ही भारतासाठी भयंकर जाणवत आहे. अशातच राज्यालाही करोनाची झळ सोसावी लागत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. दरम्यान टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केला आहे.

कोरोना संदर्भात बोलताना तात्याराव लहाने म्हणाले की, कोरोना व्हायरसची ताकद सतत वाढते आहे. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. त्यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगू शकत नाही. मात्र कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे कोरोना विरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

आकडेवारी बाबत सक्त आदेश

यावेळी पुढे बोलताना लहाने म्हणाले कोरोना रुग्णांची आकडे लपवायचे नाहीत असे आम्हाला आदेश आहेत. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोना बाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोना बाधित म्हणूनच दाखवला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचा तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केलं. तसंच राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांवर गेली असली तरीही सरकारने ऑक्सिजन बेड आणि वेंटिलेटरची व्यवस्था केली आहे. असे लहाने म्हणाले.

Leave a Comment