Thursday, February 2, 2023

इंग्लंड सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का; रोहित शर्माला दुखापत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 10 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

अ‍ॅडलेडमध्ये रोहित शर्माकडून क्रिकेटचा सराव केला जात होता. यावेळी त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली. त्यामुळे त्याला सराव अर्ध्यावर सोडावा लागला. दरम्यान, रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, यावर अजूनतरी बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गुरुवारी भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत रोहित शर्मा दुखापतीमुळे जर बाहेर पडल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सध्याच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार रोहित शर्माने पाच सामन्यांत फलंदाजी करताना 89 धावा केल्या आहेत.