औरंगाबाद : अजिंठा लेणीच्या परिसरात एक वाघ फिरताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आला आल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीसरात अनेक पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येत असतात त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक देखील या ठिकाणी आहेत.
परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना खबरदारी घ्यायला लावली आहे. सहायक वनसंरक्षक अरुण पाटील यांनी सांगितले दोन ते तीन दिवसापुर्वी लेणी मध्ये तीन चार वर्षांच्या एका वाघाचा वावर असल्याचा सीसीटीव्ही मध्ये दिसले. यामुळे पर्यटकांना काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने अजिंठा परिसरात सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी हॉटेल व्यवसाययिकांकडून टाकण्यात येणारे खरकटे अन्न खाण्यासाठी कुत्री जमा होत आहेत. या कुत्र्यांच्या शिकारीसाठी रात्री वाघ फिरत आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यायला आहे. जंगल परिसरातून फिरताना हाततात मोबाईल ठेवून गाणे वाजवत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजिंठा भागात अनेक बिबट्या आणि वाघाचा वावर आहे. आता एक लहान वाघ लेणी भागात फिरताना आढळून आला आहे.