हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आजकाल चारचाकी गाडी म्हणजे लोकांची गरज बनली आहे. मालाची वाहतूक करण्यासाठी किंवा इकडे तिकडे फिरण्यासाठी सर्रास चारचाक्या रस्त्यावर दिसतात. तुम्हालाही चारचाकी गाडी चालवायला शिकायचं असेल, परंतु पैशाची चिंता असेल तर आज आम्ही तुमची हि चिंताच दूर करणार आहोत. कारण तुम्हाला माहितेय का? सरकार कडून आता चार चाकी वाहन शिकणाऱ्यांना सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाद्वारे हि नवीन योजना राबवण्यात येईल. या योजनेअंतर्गत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्याला ५००० रुपये मिळणार आहे.
कोणाला मिळणार अनुदान –
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजनेंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु हि योजना सरसकट सर्वांसाठी नाही. म्हणजेच काय तर चारचाकी शिकत असताना ५००० रुपयांचे अनुदान हे सर्वांसाठी नाही तर कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच असेल. एका कुटुंबातील तीन सदस्य लाभ घेऊ शकतात.
कशी आहे प्रोसेस ?
या योजेनच्या माध्यमातून इच्छुकांना चारचाकी चालवण्याचे (LMV) प्रशिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. पण यासाठी शासनमान्य ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. एकदा का तुम्ही चारचाकी गाडी शिकला आणि तुमचे ड्रायविंग लायसन्स आले कि मग योजनेतून दिली जाणारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी सदर व्यक्तीचे वय 18 वर्षांवरील असावा. महत्वाची बाब म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करून आणि परवाना मिळाल्याच्या एका वर्षाच्या आत योजनेसाठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. उशिरा अर्ज करणाऱ्यांचे अर्ज बाद होऊ शकतात.
अर्ज कुठे कराल?
चारचाकी वाहन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. www.public.mlwb.in ह्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र अर्ज करताना आपल्या निवासस्थानाजवळचे किंवा कामाच्या ठिकाणाजवळचे ‘कामगार कल्याण केंद्र’ सिलेक्ट करा.




