हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार चालवायला तर सर्वाना आवडत पण गाडी चालवणं हे म्हणावं तेवढं सोप्प नसत. त्यासाठी सगळीकडे लक्ष द्यावं लागत. त्यातच डोंगरच्या पायथ्याशी किंवा घाटात गाडी चालवायचं म्हंटल तर ते आणखी जोखमीचं काम… पण काही चालक असे असतात की रस्ता कसाही असो, ते त्यातून मार्ग काढणारच .. असाच एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विडिओ पाहताच तुम्ही या गाडीच्या चालकाला सलाम ठोकाल.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गाडीच्या लांबी पेक्षाही लहान असलेल्या रस्त्यावरून चालक अतिशय हुशारीने गाडी बाहेर काढत आहे. विशेष म्हणजे पाठीमागील बाजूला मोठी दरी आहे. तरीही हा चालक न घाबरता अतिशय धैर्याने या गाडीला बाहेर काढतोय. खरं तर सुरुवातील व्हिडिओ पाहताच तुम्हालाही असं वाटेल अशा परिस्थितीतून गाडी बाहेर काढणं जवळजवळ अशक्य आहे, पण हा चतुर चालक हे आव्हान लीलया पूर्ण करताना दिसतोय. गाडीची मागील दोन चाके दरीच्या दिशेने झुकलेली असतानाही चालकाने अतिशय चलाखीने यु टर्न घेतलाय.
Unbelievable! Master driver! pic.twitter.com/1X1BTgkMuK
— The Figen (@TheFigen_) October 22, 2022
अतिशय निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने चालकाने कार बाहेर काढली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ दोन कोटीपेक्षा अधिक युजर्सनी पाहिला आहे. अनेक नेटकऱ्यानी चालकाच्या कलेला दाद देत त्याच कौतुक केलं आहे. प्रसंग कसाही असला तरी जिद्दीने त्यातून मार्ग काढायचा हेच या व्हिडिओतून अधोरेखित होत.