Car GST Price Cut : लाखो रुपयांनी स्वस्त झाल्या या 6 गाड्या; GST कपातीचा ग्राहकांना फायदा

Car GST Price Cut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Car GST Price Cut । केंद्र सरकारने GST दर कमी करत सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीपूर्वीच मोठी भेट दिली आहे. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंसोबतच गाड्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे दसरा आणि दिवाळीला गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन GST दरांनुसार, 4 मीटरपेक्षा लहान (under 4m) गाड्यांवर सर्वात जास्त जीएसटी कपात झाली आहे. अनेक गाड्यांच्या किंमतीत बदल झाला असला तरी, काही विशिष्ट गाड्यांना 1 लाखांपेक्षा जास्त सूट मिळालाय आहे. तुम्हीही दिवाळीला किंवा दसऱ्याला नवीन गाडी घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या जीएसटी कपातीनंतर लाखो रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. चला तर मग पाहुयात कोणती कार किती रुपयांनी स्वस्त झाली आहे.

कोणती गाडी किती रुपयांनी स्वस्त ? Car GST Price Cut

मारुती एस-प्रेसो तब्बल 1.30 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत फक्त 3.49 लाख रुपये आहे.

Honda Amaze च्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत आता 10 लाखांच्या खाली आली असून ती 1.2 लाखांनी स्वस्त झाली आहे.

मारुती सिलेरियो आता 94,100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कारची नवीन किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होतेय.

Kia Syros : Syros वर 1.86 लाख इतकी किंमत कपात झाली असून हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्काउंट आहे.

Skoda Kylaq : निवडक व्हेरिएंट्सवर 1 लाखा ते 1.11 लाखाइतकी किंमत कपात झाली आहे. Car GST Price Cut

Nissan Magnite : Magnite ची किंमत आता 1 लाखापर्यंत कमी झाली आहे.

Maruti Arena cars : Alto, Brezza आणि S-Presso या गाड्यांवर 1 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची कपात झाली आहे.

Maruti Nexa cars : Fronx वर 1.12 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे.

Mahindra XUV 3XO : GST कपातीनंतर XUV 3XO ची किंमत 1.56 लाखाने कमी झाली आहे आणि यासोबत इतर अतिरिक्त लाभही मिळत आहेत.

Hyundai Venue : Venue ची किंमत 1.23 लाखाने कमी झाली असून N-Line व्हेरिएंट 1.19 लाखाने स्वस्त झाले आहे.

Tata Altroz ची किंमत आता 1.10 लाखापर्यंत कमी झाली असून एकूण 1 लाखापर्यंत सूट मिळत आहे. Car GST Price Cut

मध्यमवर्गीयांची आवडती कार मारुती ऑल्टो K10 आता 1.08 लाख रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत फक्त 3.69 लाख रुपये झाली आहे.

Toyota Urban Cruiser Taisor चं टॉप-एंड व्हेरिएंट आता 1.11 लाखाने स्वस्त झाले आहे.

मारुती बलेनोची किंमत 86,100 रुपयांनी कमी झाली असून ती आता 5.98 लाख रुपयांत उपलब्ध आहे.

Kia Sonet च्या टॉप-एंड व्हेरिएंटवर तब्बल 1.64 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे.

मारुती वैगनआर 79,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कारची नवीन किंमत फक्त 4.97 लाख रुपये.