नागपूरमध्ये भीषण अपघात; कार- दुचाकीच्या धडकेत चौघे 80 फूट उड्डाणपूलावरून खाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर येथे कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कारच्या धडकेने दुचाकी थेट 80 फूट उंच उड्डाणपूलावरून खाली कोसळली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला.

नागपूरच्या सक्करदरा पुलावर हा अपघात झाला आहे. पूलावरून जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील चौघे जण 70 ते 80 फूट उंचीच्या फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. यामध्ये चौघांचीही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मृत पावलेल्यांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.