Hero Splendor ची इंधन कार्यक्षमता असलेल्या कारचे झाले भारतात अनावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला भारतात घराघरात ब्रँडेड कार (Car) दिसून येतात. मग ती टाटा मोटर्सची असो किंवा महिंद्रा असो किंवा इतर कोणती असो. तंत्रज्ञान दिवसेंदिवस पुढे जात असून आत्तापर्यंत भारतात अनेक इलेक्ट्रिक बाईक, कार निर्माण झाल्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्या नागरिकांच्या पसंतीस सुद्धा पडल्या. काही दिवसांपूर्वी हीरो स्प्लेंडरची इंधन-कार्यक्षमता असलेली कार भारतात येणार ह्याची चर्चा सुरु होती. आणि आज तिचे अनावरण सुद्धा देशात करण्यात आले आहे. आज आपण या कारचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

काय आहे ह्या कारचे वैशिष्ट्य?

शेल इको-मॅरेथॉन अर्बन कन्सेप्ट ही मिड-इंजिन मायक्रोकार आहे. ही गाडी बॉडी मायक्रोकार कार्बन फायबर आणि पेपर हनीकॉम्ब कोरसह इपॉक्सी लॅमिनेटपासून तयार करण्यात आली आहे. कारमधील विशेष गोष्ट म्हणजे कारमध्ये इन्स्ट्रुमेंट स्क्रीन, 1kg ABC अग्निशामक, गरम विंडस्क्रीन व्हेंटिलेशन आणि फॅन, स्पार्को स्टीयरिंग व्हील, LED हेडलाइट्स, 5-पॉइंट सेफ्टी हार्नेस, रेसिंग बकेट सीट्स, लॅमिनेटेड ग्लास विंडस्क्रीन, आणि पावसासाठी वायपर बसवण्यात आले आहेत.

295 किलोग्राम वजन असलेली हिरो स्प्लेंडर

ह्या गाडीच्या आकाराबाबत सांगायचं झाल्यास, कारची लांबी ही 2850 मिमी असून त्याची रुंदी 1260 मिमी आहे तर त्याची उंची 1224 मिमी आणि 2000 मिमीचा व्हीलबेस देखील बसवण्यात आला आहे. गाडीचा ग्राउंड क्लीयरन्स 100mm आहे आणि त्याचे कर्ब वजन 295 किलोग्राम एवढे आहे.

75 किलोमीटर पर्यंत करू शकते प्रवास

कारची 350 मिली इंधन टाकीची क्षमता असून शेलचा दावा आहे की, गाडीचे टॉप स्पीड हे 55 किमी प्रतितास एवढा असून,  एक लिटर पेट्रोलमध्ये तब्ब्ल 75 किमी पर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता यामध्ये आहे.

यामाहा स्कुटरकडून घेतले 4-व्हॉल्व्ह इंजिन

स्प्लेंडर कारसाठी यामाहा स्कूटरकडून  4-व्हॉल्व्ह इंजिन ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच गाडीचा पॉवर हा नेहमी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. तर ह्या कारमध्ये 125cc फोर्स्ड एअर-कूल्ड 4-स्ट्रोक सिंगल सिलेंडर, CVT ट्रांसमिशन,  SOHC, इंजिनची 9 hp पॉवर आणि 9.5 Nm टॉर्क देते. त्यामुळे कार ही विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.

टायरमध्ये आहेत मल्टी-स्पोक व्हील

कोणत्याही गाडीचा किंवा टायरची क्षमता आणि तिचे वैशिष्ट्य हे महत्वाचे मानले जाते. हे लक्षात घेऊन ह्या कारमध्ये सिरेमिक व्हील बेअरिंगसह Michelin M45 90/80-R16 टायरमध्ये गुंडाळलेली मल्टी-स्पोक व्हील बसवण्यात आले आहेत.  आतापर्यन्त हिरो स्प्लेंडर ही बाईक होती मात्र आता बाईकचे रूपांतर हे कारमध्ये करण्यात आले आहे. आता ह्याचा प्रतिसाद भारतात किती मिळतो हे पाहणे गरजेचे आहे.