Cardiac Arrest | हृदयविकाराचा झटका आल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात?, अशी घ्या काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cardiac Arrest | आज सकाळी टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंग याचे निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना पोटाच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. तिथून त्यांना घरी सोडले. परंतु रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

आज काल लोकांचे राहणीमान जीवनशैली एवढी बदलली आहे की, हृदयविकाराचा झटका येणे ही आजकाल अत्यंत सामान्य गोष्टी झालेली आहे. अगदी 15 वर्षापासून ते 50 55 वयोगटातील लोकांना देखील हा हृदयविकाराचा झटका येतो. परंतु हा हृदयविकाराचा झटका म्हणजे कार्डीयाक अरेस्ट म्हणजे नक्की काय असतं? त्यामागे काय कारण असतात?आणि जेव्हा आपल्याला हृदय विकाराचा झटका येतो तेव्हा आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कार्डीयाक अरेस्ट ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये बहुतेक लोक आपला जीव गमावतात. यावेळी आपल्या हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. या आजारामुळे जगभरात दरवर्षी जवळपास हजारो लोकांचा मृत्यू होतो. हृदयाची ठोके अचानक खूप वेगवान होतात. आणि काही काळानंतर अचानक बंद होतात.

परंतु जर त्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले, तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत रुग्णाला सीपीआर सुरू करणे आवश्यक आहे. म्हणजेच तोंडाने श्वास घेणे आणि दोन्ही हातांनी छातीवर जोरदार मारणे. या सगळ्या गोष्टी उपचार मिळायच्या आधी केले तर तो व्यक्ती जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला इतरत्र कोणालाही अशी स्थिती आली, तरी आपण या दोन गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे | Cardiac Arrest

हृदयविकाराचा झटका काहीवेळा इतका अचानक येतो की, त्याची लक्षणे देखील ओळखता येत नाहीत. आणि जाणवत सुद्धा नाही. अशा स्थितीत काहीवेळा रुग्ण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला की, व्यक्ती खाली पडतो.

त्याला पाठीवर किंवा खांद्यावर मारूनही तो व्यक्ती कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. अशावेळी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके अचानक वेगवान होतात. आणि त्यांना नीट श्वास देखील घेता येत नाही. त्यावेळी व्यक्तीचा रक्तदाब देखील थांबतो आणि मेंदू तसेच शरीराच्या इतर भागात रक्त पोहोचत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला जीव गमवावा लागतो.

हृदयविकाराचा धोका कसा टाळावा

यासाठी तुमच्या आरोग्य तंदुरुस्त असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही सकस आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे कमी तेलाच्या आणि कमी कोलेस्ट्रॉलच्या अन्न खाल्ले पाहिजे. तसेच गोड पदार्थांचे सेवन देखील कमी केले पाहिजे. आणि तुमच्यात लठ्ठपणा देखील नियंत्रित ठेवला पाहिजे. केवळ खाण्याच्या पद्धती नाही तर तुमचे झोपेच्या वेळा देखील नियमित पाळल्या पाहिजेत.

आपले जीवन संतुलन ठेवण्यासाठी तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्राणायाम योगा आणि रोज व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अल्कोहोल किंवा सिगारेट यांसारख्या मद्यपदार्थांचा वापर टाळला पाहिजे. त्यामुळे तुमच्या हृदयाला कोणतीही हानी होणार नाही त्याचप्रमाणे दारूचा देखील आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहिले तर आपल्या आरोग्य नक्कीच चांगले राहील.