आयुष्याची दिशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आयुष्यात यश मिळवण्याचे गमक अनेकांनी सांगितले आहे. काहींनी तर ‘कष्ट’ हेच यशाचे गमक असे म्हटले , तर काहींनी त्यागाला यशाचे गमक म्हटले आहे.परंतु फक्त कष्टानेच संपूर्ण यश मिळते का ? यशाचे खरे गमक काय आहे…? याचे एका विचारवंताने दिलेले उत्तम उत्तर म्हणजे “योग्य दिशेने केलेले कष्ट, चिकाटी होय “.

खरेच एखाद्या ठिकाणी पोहचायचे असेल तर आपल्याला त्या ठिकाणाकडे जाणारी दिशा माहीत असली पाहिजे . अगदी त्याचप्रमाणे आयुष्याला देखील योग्य दिशा पाहिजे. कारण दिशाहीन आयुष्य हे मरणापेक्षा घातक असते. आजचे आमचे विद्यार्थीमित्र हे दिवसेंदिवस व्यसनांच्या , नैराश्याच्या आहारी जात आहेत, याचे कारण दिशाहीनता हेच आहे. याच वेळी उभ्या मानवजातीला मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषाची आठवण होते.
आयुष्याचे सार्थक करायचे असेल तर काहीतरी करून दाखवा.

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या कष्टाने, सोन्याहून पिवळा बनवा, आपले अवगुण, अज्ञान, अधोगती यांवर मात करून ज्ञान आणि प्रगतीची निर्मिती करा. अशी सकल मानव जातीच्या उद्धाराची, ज्ञानाची, प्रगतीची दिशा ही बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भगत सिंग या महामानवांनी दिली आहे. आता खरच गरज आहे ती यांच्या वैचारिक दिशेवर मार्गक्रमन करण्याची. “सगळे करता म्हणून करू किंवा कोणी करत नाही म्हणून नाही ,अशा प्रवाहा सोबत न जाता महामानवांप्रमाने एक ज्ञानाची , मानव समाजास कल्याणकारी असणारी दिशा आपण पत्कारून मानवाच्या प्रगतीसाठी नवीन प्रवाहाच आपण तयार करायला हवा. याची जबाबदारी आता तुमच्या माझ्या सारख्या विद्यार्थी यांवर आहे. तरी आपण सर्वा विद्यार्थी यांनी ही दिशाशील, ध्येयशील होऊन आयुष्यात यश मिळवावे ही विनंती.

संकेत बाबासाहेब मस्के

(SYBSC) Fregusson College Pune.

Leave a Comment