महिलांच्या हातात आता ‘एसटी’चे स्टेअरिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । “कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले असून त्याचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल” असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने १६३ महिला बस चालकांच्या प्रशिक्षणाच्या वेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने १६३ महिला बस चालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ पुण्यात काल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पार पडला. परिवहनमंत्री दिवाकर रावते , विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे , आमदार माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

महिला चालकांसाठी नियम शिथिल
एसटी महामंडळात चालक पदासाठी अवजड वाहन चालक परवाना व त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव या अटी शिथील करून एक वर्ष हलके वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिलांना आता संधी मिळणार आहे.
महिलांसाठी किमान उंचीची अट १६० सेंमी वरुन १५३ सेंमीपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

राज्यातील ९३२ महिला उमेदवारांनी महिला बस चालक या पदाकरिता अर्ज केले त्यापैकी ७४३ महिला उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यातून १५१ महिला अंतिम प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.

Leave a Comment