मुंबईतील स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार सापडलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला लातूर मधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जून पर्यंत त्याना कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की NIA च्या पथकाने नव्यानं दोन जणांना अटक केली आहे. संतोष आणि आनंद असे अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावे यातील एका जणाला लातूरमधून अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर दोघांना एका विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता 21 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांचा या प्रकरणांमध्ये काय हात होता याचा तपास करत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाहीत त्यामुळे या मृत्यू प्रकरणाचा गूढ अजूनही कायम आहे. मनसुख यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तपास यंत्रणा संभ्रमात आहे

You might also like