हसन मुश्रीफ यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल : किरीट सोमय्याचे ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर |  महाराष्ट्रचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या छाप्यानंतर आता कोल्हापूर साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. यामध्ये 40 कोटीची फसवणूक (कलम- 420) केल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील व्यापारी विवेक कुलकर्णी यांनी हसन मुश्रीफ विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये मुश्रीफ यांनी बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथे लोकांच्या सहभागातून कारखाना उभा करण्यासाठी भागभांडवल 2012 सालापासून अंदाजे 10 हजार रूपये शेअर भांडवल उभे करण्याचे काम सुरू केले. परंतु आजपर्यंत कारखान्याकडून पावती, दस्ताऐवज दिला नाही.

हसन मुश्रीफ यांनी अनेक ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेवून शेअर भांडवल गोळा केले. 2012 साली यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाचाही फोटो फिर्यादीने जोडला आहे. या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण कोल्हापूरच्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी संबंधित आहे. या कारखान्यातील 98 टक्के रक्कम मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून जमा झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. या घोटाळ्यात हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मांगोली यांचाही पूर्ण सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.