कृषिमंत्री सत्तारांचे मंत्रिपद धोक्यात? निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणाने धोक्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या प्रमाणपत्रात खोटी माहिती लिहल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलाच धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूकी वेळी जमा करण्यात आलेल्या प्रतिक्षापत्रात सत्तार यांनी आपल्या जमिनीच्या संदर्भात खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. सत्तार यांनी २०१४ मध्ये जमीन खरेदी केली होती. ज्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना संपत्तीची माहिती मागितली त्यावेळी त्यांनी आपल्या जमिनीची किमत जास्त सांगितली. इतकेच नव्हे तर, त्यांनी हे इतर मालमत्तेसोबत देखील केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सिल्लोड न्यायालयाने त्यांना त्यांच्यावर फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

दरम्यान २०२१ मध्ये अब्दुल सत्तार यांनी निवडणूकीच्या प्रतिक्षापत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी दिल्ली न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या सर्व प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले होतो. या तपासातच सत्तार यांनी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच इथून पुढे सहा वर्षे ते निवडणूक लढवण्यास अपात्र सुद्धा ठरू शकतात.