व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांना नोबेल पुरस्कार जाहीर!! कोविड लस तयार करण्यात मोठे योगदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेइसमन हे दोघेजण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कोरोना काळात बनवण्यात आलेल्या प्रभावशाली mRNA कोविड लस निर्मितीमध्ये या दोन्ही शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळेच आज त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याची माहिती The Nobel Price ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

कोरोना काळात संपूर्ण जग मोठ्या संकटात अडकले होते. त्यामुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी प्रभावशाली लस निर्माण करण्याची अति आवश्यकता होती. अशा काळात कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेइसमन या दोन्ही शास्त्रज्ञांनी mRNA आपल्या इम्युन सिस्टिमवर कसा प्रभाव टाकतो याचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या या अभ्यासामुळेच कोरोनावर मात करणारे कोविड लस तयार करण्यात आली. आज त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळेच त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेइसमन या दोघांना देखील यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्षभरात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. त्यानुसार यावर्षी नोबेल पुरस्काराचे मानकरी कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेइसमन ठरले आहेत. नोबेल पुरस्कार हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. जगातील सर्व पुरस्कारांमध्ये नोबेल पुरस्कार हा सर्वात मानाचा पुरस्कार आहे. त्यामुळे हा पुरस्कार फक्त निवडक व्यक्तींनाच दिला जातो.

नोबेल पुरस्काराचे मानधन किती?

संपूर्ण जगभरातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये नोबेल पुरस्काराला विशेष मान आहे. या पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या विजेत्याला डिप्लोमा, एक पदक देण्यात येते. तसेच त्या व्यक्तीला 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे 757,64,727 रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते. जर एखाद्या वर्गामध्ये एकापेक्षा जास्त विजेते असतील तर बक्षीस रक्कम ही त्यांच्यामध्ये विभागण्यात येते. दरवर्षी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त 10 डिसेंबर रोजी नामांकित विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.