Hotel Room मध्ये Gf सोबत असताना पोलिसांनी पकडले? अशावेळी काय करावं??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समजा तुम्ही कधी तुमच्या गर्लफ्रेंड (Girlfriend) सोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलवर थांबला आणि अशावेळी जर पोलिसांची (Police) धाड पडली तर काय करावं ? असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. खरं तर अशावेळी काय करावं हेच आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतो. पण घाबरू नका, आज आम्ही तुम्हाला अशा प्रकरणातील कायद्याबाबत (Law) सांगणार आहोत.

खरं तर 18 वर्ष पूर्ण झालेले परंतु लग्न न झालेले मुला- मुलींनी हॉटेलमध्ये रूम बुकिंग करून एकत्र राहू नये असं आपल्या कायद्यात कुठेही म्हटलेलं नाही. परंतु कधी कधी पोलीस अशा परिस्थितीत मुलाना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, आणि मुलांना कायदा माहित नसल्याने आणि प्रकरण उगीच वाढू नये म्हणून अशावेळी मुलेही पोलिसांना पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात.

परंतु, जर आपण 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि आपण अधिकृत बुकिंग केलं असेल तर अशावेळी पोलिसांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. जरी पोलीस म्हणाले की तुमच्या घरात सांगेन किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, तरीही त्याची काहीच गरज नाही.

परंतु तरीही पोलीस तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळी एक तर तुम्ही त्याचे विडिओ रिकॉर्डिंग करू शकता. किंवा 112 क्रमांकावर फोन लावायला हवा जिथे तुम्ही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा (Prevention of Corruption Act) आणि खंडणीच्या आरोपाखाली तुम्ही त्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल करू शकता. कंट्रोल रूममधील प्रत्येक कॉल रेकॉर्ड केला जातो. परंतु असं व्हायला नको कि तुम्ही हॉटेल वाल्याला कॅश मध्ये पैसे दिले आणि त्याने अवैधरित्या तुम्हाला रूम बुक करून दिली. तुमचं बुकिंग वैधच असायला हवं तरच तुम्ही यातून वाचू शकता.