CBSE 10th Result 2024 | CBSE बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

CBSE 10th Result 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CBSE 10th Result 2024 | इयत्ता दहावीच्या CBSE विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजे CBSE चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा निकाल बघू शकता. त्याचप्रमाणे CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल तुम्ही डीजीलॉकरवर देखील पाहू शकता. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक किंवा ओळखपत्राचा वापर करावा लागेल.

या परीक्षेत देशभरातील एकूण 93.60% विद्यार्थी पास झालेले आहेत. दहावीची परीक्षा ही 15 मार्च ते 13 मार्च यादरम्यान विविध केंद्रांवर घेण्यात आलेली होती. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील यावर्षी मुलींनीच बाजी मारलेली आहे. मुलींचा निकाल हा 94.75 टक्के लागलेला आहे, तर एकूण निकाल हा 93.60% लागलेला आहे.

अशाप्रकारे पहा सीबीएससी दहावीचा निकाल | CBSE

  • सगळ्यात आधी CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट ओपन करा
  • त्यानंतर होम पेजवर जाऊन निकाल विभागावर जा.
  • यानंतर आता सीबीएससी इयत्ता दहावीवर क्लिक करा.
  • नंतर तुमचा रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाईप करा .
  • तुम्हाला स्क्रीनवर सीबीएससी बोर्ड निकाल 2024 असे दिसेल.
  • तिथे तुम्ही निकाल बघून तो डाउनलोड देखील करू शकता

निकाल बघण्यासाठी वेबसाईट

https://cbseresults.nic.in

https://cbseresults.nic.in