CBSE 12th board exam: सुप्रीम कोर्टातील परीक्षांबाबत सुनावणी स्थगित,पुढील सुनावणी 31 मे रोजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बारावी CBSE ची परीक्षा रद्द करण्यात यावी या संदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची याचिका ऍड . ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर सोमवारी सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना CBSE बोर्डाच्या वकिलांना याचिकेची अ‌ॅडव्हान्सड कॉपी देण्याबाबत सांगितलं आहे.ममता शर्मा यांच्या याचिकेवर सोमवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. आयसीएसई बोर्डाकडून ज्येष्ठ वकील जे.के.दास सुनावणीला हजर होते.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बारावी परीक्षा संदर्भात 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. त्यानंतर रमेश पोखरियाल यांनी 25 मे पर्यंत सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांकडून अहवाल मागवले होते. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता पुन्हा या याचिकेवरील सिनावणी 31 मे रोजी होणार आहे.

Leave a Comment